maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू


One of the injured died during treatment
धोंडेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सातारा : धोंडेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. २ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास धोंडेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत धनाजी आनंदराव चिकणे वय ७७, रा. धोंडेवाडी हे सातारा- रहिमतपूर मार्गाने पायी चालत जात असताना त्यांना कारने धडक देऊन जखमी केले होते. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.