जिल्ह्यात दरोडेखोरांचा सुळसुळाट वाढला असून फक्त दोन दिवसांत चारठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांमध्ये दरोडेखोरांनी तब्बल 6 लाख 32 हजारांचा ऐवज लंपास करण्यात यश मिळवले आहे.
सातारा : जिल्ह्यात दरोडेखोरांचा सुळसुळाट वाढला असून फक्त दोन दिवसांत चारठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांमध्ये दरोडेखोरांनी तब्बल 6 लाख 32 हजारांचा ऐवज लंपास करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 4 जानेवारी रोजी 8.30 ते 5 जानेवारी रोजी 5.30 वाजण्याच्या सुमारास जिहे, ता. सातारा तेथीलच कृष्णात दादासो फडतरे, वय 40 यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी चोरून आत प्रवेश करून कपाटात असलेले रोख 2 हजार रुपये व 2 हजार 500 रुपये किमतीचे लहान मुलांचे चांदीचे पैंजण चोरून नेले. तसेच कृष्णा फडतरे यांच्या घराशेजारी राहत असणार्या ज्योती शंभूराज फडतरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतील 26 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल असा एकूण 29 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अज्ञात चोरट्याने च्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसर्या ठिकाणी सदरबझारमध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी करून 63 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दि. 4 जानेवारी रोजी 10 ते दि. 5 जानेवारी रोजी 9 वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील सदरबझारमध्ये असणार्या का मग आपलं येथील अनु प्लाझा बिल्डिंग मधील बंद असलेल्या श्री मेडिकल जनरल स्टोअर्सची एक बाजु उचकटुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. मेडिकल शेजारी असणार्या उमेश महादेव मोहोटकर यांच्या प्रोटिन दुकानातुन 18 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच शितल अविनाश कदम यांच्या श्री क्लिनिकमधुन 10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण 63 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याबाबत अभिजीत सदानंद पाटील रा. कांगा कॉलनी, सदरबझार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याने च्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तिसर्या ठिकाणी दि. 5 रोजी 1.30 वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी, ता. खटाव येथील संजय आप्पासो कदम यांच्या घरावर पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून 15 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 1 लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी, 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे मनी मंगळसुत्र, कानातील एक कर्णफुल, सोन्याची अंगठी, हातातील बांगड्या तसेच 30 हजार रुपये किमतीचे सोन्याची बोरमाळ आणि अन्य सोन्याचा मुद्देमालासह 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केला. यावेळी दरोडेखोरांनी जबर मारहाण केल्याची तक्रार ही संजय आप्पासो कदम यांनी औंध पोलिस ठाण्यात दिली आहे.
चौथ्या ठिकाणी दि. 4 जानेवारी रोजी 6.30 ते दि. 5 जानेवारी रोजी 7 वाजण्याच्या दरम्यान विहे, ता. पाटण येथील सुधीर सुभाषराव पाटील यांच्या राहत्या घराचे कुलूप, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील बंद लोखंडी कपाट उचकटुन आतील 40 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच गावातीलच अमय अशोकराव कुलकर्णी, रामचंद्र गंगाराम जाधव यांच्याही घरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सुधीर सुभाष पाटील यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.


