maharashtra

बँकेत सापडलेली सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे परत

पुसेगावच्या पृथ्वीराज जाधव यांचा कराड अर्बन बँकेच्या वतीने सत्कार

The gold ring found in the bank returned honestly
आज कोरोना काळात उद्योग, व्यवसाय यांची वाईट अवस्था आहे आहे, नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा घाईला आली आहे. अशातच पुसेगाव ता खटाव येथील कराड अर्बन बॅकेच्या शाखेत सापडलेली अर्ध्या तोळ्यांची सोन्याची अंगठी पुसेगावचे प्रतिष्ठित नागरिक पृथ्वीराज जगन्नाथ जाधव यांनी प्रामाणिकपणे परत केली.

पुसेगाव : आज कोरोना काळात उद्योग, व्यवसाय यांची वाईट अवस्था आहे आहे, नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा घाईला आली आहे. अशातच पुसेगाव ता खटाव येथील कराड अर्बन बॅकेच्या शाखेत सापडलेली अर्ध्या तोळ्यांची सोन्याची अंगठी पुसेगावचे प्रतिष्ठित नागरिक पृथ्वीराज जगन्नाथ जाधव यांनी प्रामाणिकपणे परत केली.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज जाधव हे त्यांच्या कामानिमित्त कराड अर्बन बँकेत गेले होते. त्यावेळी त्यांना सुमारे २४ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी सापडली. ती त्यांनी बँकेचे अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे दिली. दोन दिवस कोणीही विचारणा न केल्याने आज बँकेच्या प्रशासनाने सी सी टीव्ही फुटेज मध्ये पाहणी केली असता ललगुण येथील माजी सैनिक राजेंद्र कळसकर यांची असल्याचे दिसून आले. बँकेच्या लॉकर मधील सुवर्ण अलंकार काढून पिशवीत ठेवताना कळसकर यांच्या कडून ती अंगठी खाली पडली होती. आज त्यांना बोलावून ती अंगठी परत देण्यात आली. बँकेचे शाखाप्रमुख किशोर कदम, अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, दत्तात्रय मोरे, सौ. श्वेता जाधव, लक्ष्मण सातपुते, वसंत मोहिते, अतुल मखरे यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज जाधव(बापू) यांचा त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच कळसकर यांनी पृथ्वीराज जाधव यांचा प्रामाणिकपणा व बँकेची कार्यतत्परता याबद्दल आभार मानले.