maharashtra

सदरबझार येथे ट्रक चालकाला मारहाण


Truck driver beaten at Sadarbazar
येथील सदरबझारमध्ये ट्रक पार्किंग केल्याचा राग मनात धरून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.

सातारा : येथील सदरबझारमध्ये ट्रक पार्किंग केल्याचा राग मनात धरून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 जानेवारी रोजी 5.45 वाजण्याच्या सुमारास सदरबझार, सातारा येथे ट्रक पार्किंग केल्याचा राग मनात धरून संजय बबन बाबर, अश्विनी संजय बाबर, पुतण्या अतुल यादव यांनी ट्रक चालक विजय सखाराम यादव, रा. सदरबझार, यांना मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे वरील तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.