येथील तहसीलदार कार्यालयासमोर असणार्या मेडिकल समोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील तहसीलदार कार्यालयासमोर असणार्या मेडिकल समोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 जानेवारी रोजी 9.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील तहसीलदार कार्यालयासमोर असणार्या कैलास मेडिकल समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. 11 एएन 1296 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सिंजीत शंकर माने, रा. सदरबझार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


