स्वरसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांना आज साताऱ्यातील रंगकर्मींकडून शब्दसूरांची आदरांजली वाहण्यात आली.
सातारा-मिरज रेल्वे दुहेरी ट्रॅकच्या कामाचा खासदार उदयनराजे भोसले यांनी विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत आढावा घेतला. सातारा जिल्ह्यातील रेल्वे विभागातील विविध नवीन कामांच्या पाठपुराव्यासाठी तसेच सध्या होत असलेल्या काही त्रुटींसंदर्भात आज डीआरएम ऑफिस येथे सर्व रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली व मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
भारतरत्न लता मंगेशकर या पंचतत्वात विलीन झाल्या. लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
फलटण नगरपरिषदेमध्ये आर्किटेक्चर परवाना काढताना सर्टिफिकेटवर नापास असताना अधिकार्यांशी संगनमत करुन प्रकाश माने यांनी आर्किटेक्ट परवाना काढून शासनाची फसवणूक केल्याबाबत बोगस आर्किटेक्चर माने यांच्यावर सात वर्षानंतर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार व कंपनी यांच्यात सुरू असलेल्या वादाचे स्वरूप आता मोठे झाले आहे. कामगार त्यांना हक्क मिळण्यासाठी न्यायालयात गेलेले असताना देखील कंपनीत त्यांना येऊ दिले जात नसल्याने हा वाद चिघळला असून आता या वादात खासदार उदयनराजे यांनीदेखील उडी घेतली असून कामगारांना न्याय द्या, अशी मागणी करत आज थेट कंपनीच्या दारात त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते, अशा शब्दात भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रेल्वे मालगाडीच्या समोर अचानक काही म्हैशी आल्यामुळे चालकाने रेल्वे मालगाडीला अचानक ब्रेक लावला. मात्र या अपघातात एका म्हैशीचा मृत्यू झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळत अन्य म्हैशी किरकोळ जखमी झाल्या.
ट्रक, टेम्पो व इतर मालवाहतुकीच्या वाहनांचे थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी करार करून घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.
शनिवारी दुपारी दोन वाजता दहिवडी- पंढरपूर मार्गावरील धुळदेव या ठिकाणी सातारा विभागाच्या बर्निग बस चा थरार पाहण्यास मिळाला. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
काही दिवसापासून खटाव तालुक्यातील वडूज परिसरात भुरट्या चोर्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने वडूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. रात्रगस्त सुरू करण्यात आली होती. याच रात्रगस्तीमध्ये अंबवडे येथे पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रूपये इतके अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील शासकिय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.