maharashtra

सात वर्षानंतर बोगस आर्किटेक्चर माने यांच्यावर अखेर गुन्हा

महारुद्र तिकुंडे यांचा दणका; केले दूध का दूध और पानी का पानी

After seven years, the crime against bogus architecture Mane finally
फलटण नगरपरिषदेमध्ये आर्किटेक्चर परवाना काढताना सर्टिफिकेटवर नापास असताना अधिकार्‍यांशी संगनमत करुन प्रकाश माने यांनी आर्किटेक्ट परवाना काढून शासनाची फसवणूक केल्याबाबत बोगस आर्किटेक्चर माने यांच्यावर सात वर्षानंतर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : फलटण नगरपरिषदेमध्ये आर्किटेक्चर परवाना काढताना सर्टिफिकेटवर नापास असताना अधिकार्‍यांशी संगनमत करुन प्रकाश माने यांनी आर्किटेक्ट परवाना काढून शासनाची फसवणूक केल्याबाबत बोगस आर्किटेक्चर माने यांच्यावर सात वर्षानंतर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण नगरपरिषदेमध्ये आर्किटेक्चर परवाना काढताना सर्टिफिकेटवर नापास असताना अधिकार्‍यांशी संगनमत करुन प्रकाश माने यांनी आर्किटेक्ट परवाना काढून शासनाची फसवणूक केल्याबाबत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी दि. 26 जून 2014 रोजी तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल केला होता. त्यावर सातारा जिल्हा प्रशासनाने प्रांत फलटण यांच्याकडून चौकशी अहवाल मागवून घेतला होता. त्यामध्ये प्रकाश माने, सुरेंद्र काळेबेरे (लिपिक फलटण नगरपरिषद), जीवन केंजळे, मारुती हरी पाटील (दोघेही नगरअभियंता नगरपरिषद, फलटण) हे दोषी असल्याचा अहवाल फलटण प्रांतांनी दिला होता. यावर सातारा जिल्हाधिकारी यांनी दि. 10 जून 2021 रोजी प्रकाश माने याच्यावर भादंवि 1860, 420 (फसवणूक, शिक्षा- 7 वर्षे व दंड), 465 (खोटी कागदपत्रे तयार करणे, शिक्षा- दोन वर्षे व दंड), 467 (किंमती व महत्त्वाच्या कागदपत्रांत फेरबदल करणे, शिक्षा- 10 वर्षे व दंड), 471 (खोटी कागदपत्रे खरे आहे असे भासवून वापरणे, शिक्षा-दोन वर्षे व दंड) अन्वये फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फलटण नगरपरिषदेचा लिपिक सुरेंद्र काळेबेरे याची विभागीय चौकशीचे आदेश, फलटणचे नगर अभियंता जीवन केंजळे व मारुती हरि पाटील हे अधिकारी राज्यसंवर्गातील असल्याने त्यांची विभागीय चौकशी फलटण नगरपरिषदेमार्फत प्रस्तावित करुन संचालक नगरपरिषद प्रशासन, संचलनालय मुंबई यांच्यामार्फत करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
या अधिकार्‍यांवर कारवाई झाल्याने प्रशासनिक अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. माने याने केलेल्या कृष्णकृत्याचा सुगावा लागल्याने माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी फलटण नगरपरिषदेचा हा गोरखधंदा उघडकीस आणल्याने त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

लोकशाही व प्रशासनामध्ये काम करीत असताना अधिकार्‍यांचे अनेक गोरखधंदे समोर येत असतात. याबाबत वरिष्ठ पातळीवर वारंवार तक्रारी, अर्ज दाखल करावे लागतात. तक्रारींचा पाठपुरावा व्यवस्थित झाला तर न्याय मिळण्यास विलंब होतो. मात्र, न्याय मिळतोच हे या प्रकरणावरुन स्पष्ट होत आहे. तब्बल सात वर्षानंतर माने याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मागील सात वर्षात बोगस डिग्री घेवून माने याने जी काही कामे केली त्याचे काय? हाही प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.
- महारुद्र तिकुंडे (माहिती अधिकार)
संस्थापक-अध्यक्ष युवाराज्य फौंडेशन, महाराष्ट्र राज्य.