maharashtra

दहिवडी- पंढरपूर मार्गावरील धुळदेव या ठिकाणी बर्निंग एस टी बस चा थरार


Burning ST bus at Dhuldev on Dahivadi-Pandharpur route
शनिवारी दुपारी दोन वाजता दहिवडी- पंढरपूर मार्गावरील धुळदेव या ठिकाणी सातारा विभागाच्या बर्निग बस चा थरार पाहण्यास मिळाला. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

सातारा : शनिवारी दुपारी दोन वाजता दहिवडी- पंढरपूर मार्गावरील धुळदेव या ठिकाणी सातारा विभागाच्या बर्निग बस चा थरार पाहण्यास मिळाला. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या गाडी क्रमांक - एम एच 11 बी एल 9355 साधी बस घेऊन चालक शंकर पवार बिल्ला क्रमांक - 978 व वाहक सुधीर जाधव 31567 हे 44 प्रवाशी घेऊन सातारा- सोलापूर मार्गावर एसटी घेवून जात असताना म्हसवड पासून 12 किलोमीटर अंतरावर धुळदेव गाव हद्दीतील बस स्थानकानजिक रस्त्यावर गिअर बॉक्स वरील बोनेट मधून धूर येत असल्याचे चालकाला जाणवले. त्यामुळे चालकाने त्वरित बस एका बाजूला उभी केली व पाहिले असता गिअर बॉक्स वरील बोनेट मधून आग बाहेर येत असल्याचे जाणवताच चालक व वाहकांनी सर्व प्रवाशांना सुखरूपपणे एस टी बस मधून बाहेर काढले. यानंतर क्षणातच संपूर्ण एसटीने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमध्ये कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. बसला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी म्हसवड पालिकेला कळवताच तत्काळ म्हसवड पालिकेच्या आग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.
आग आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद होती. त्यामुळे पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा काहीकाळ खोळंबा झाला.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढीला लागल्याने अनेक वाहने पेट घेण्याचे प्रमाण अधिक असते. याबाबत सर्व वाहनांची खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.