महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सातारा नगरपालिकेचे बजेट नामंजूर करा : सुशांत मोरे यांची मागणी

सातारा नगरपालिकेचे सन 2021-2022 सुधारित व सन 2022-23 चे अंदाजपत्रक नामंजूर करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी युक्रेन देशातून मायदेशी सुखरुप परतले

युक्रेन देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 22 विद्यार्थी हे या देशामध्ये निवासी होते. युध्द काळापूर्वी 3 विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले होते. परंतू, 19 विद्यार्थी युध्द काळात युक्रेनमध्ये अडकले होते.

esahas.com
महाराष्ट्र

महिला दिनी सातारा येथे विविध संघटनांच्या आंदोलनाचा एल्गार

८ मार्च रोजी सातारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाबाहेर जिल्ह्यातील विविध संघटनांनी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारला. या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनाची तीव्रता पाहून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

esahas.com
महाराष्ट्र

भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी करुनही जिल्हाधिकारी सर्वोत्कृष्ट कसे ?

राज्य सरकारने कोरोना काळात चांगले काम केले म्हणून राज्यातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये सातारचे जिल्हाधिकारी यांना देखील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर केलेला आहे. मात्र, मी राज्य शासन व आयुक्तांकडे कोरोना काळात प्रशासनात झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप पुराव्यानिशी करुन देखील त्यांना हा पुरस्कार कसा जाहीर झाला आहे असा माझा सवाल असून राज्य शासनाने हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अजिंक्यताऱ्यावर सलग दुसऱ्या दिवशी वणवा

सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी समाजकंटकांनी वनवा लावल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यातील वणवा लावण्याची ही सलग सातवी घटना असून समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी सातारा शहरवासियांमधुन होत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे

महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पाहिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हा ओबीसी संघटनेचे सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आज सातारा येथे बोंबाबोंब आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना निवेदन पाठवले.

esahas.com
महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले संघर्ष गौरव पुरस्काराचे 9 रोजी साताऱ्यात वितरण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार 6000 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समारोह समितीच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार

सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या मागणीला दुजोरा देत भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

esahas.com
महाराष्ट्र

अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.