सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महेंद्र शंकर माने, वय ३५, रा. काळचौंडी, ता. माण याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महेंद्र शंकर माने, वय ३५, रा. काळचौंडी, ता. माण याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ मार्च रोजी १ ते २ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात एका शासकीय इमारतीसमोर महेंद्र शंकर माने याने एका महिलेला फोन करून बोलून घेतले. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये चल मला तुझ्या बरोबर बोलायचे आहे, असे तो म्हणाला. नकार देताच त्याने तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


