दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयवंत बापू जानकर, वय ४०, रा. चितळी, ता. खटाव यांनी दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर वडुज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


