maharashtra

गवंडी काम करत असताना दुसर्‍या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू


One died after falling from the second floor while working as a bricklayer
गवंडी काम करत असताना दुसर्‍या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सातारा : गवंडी काम करत असताना दुसर्‍या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरालाल लिंबाजी सगर, वय ४५, रा. लोणंद, ता. खंडाळा हे गवंडी काम करत असताना दुसर्‍या मजल्यावरून पडून डावा पाय फॅक्चर होऊन त्यात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. वैष्णवी सुकळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.