maharashtra

सातारा येथून दुचाकीची चोरी


Theft of two-wheeler from Satara
येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या वीज वितरण कार्यालया जवळून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या वीज वितरण कार्यालया जवळून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ मार्च रोजी ११.४५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या वीज वितरण कार्यालया जवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच. ११ एएच ११७९ चोरून नेल्याची तक्रार दीपक हणमंत पवार, रा. किडगाव, ता. सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.