येथील अजिंक्यतारा किल्ला परिसरात वन विभागाच्या हद्दीमध्ये वणवा लावणाऱ्या चारूदत्त पांडुरंग देशपांडे, रा. मंगळवार पेठ, सातारा यांना न्यायालयाने ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
सातारा : येथील अजिंक्यतारा किल्ला परिसरात वन विभागाच्या हद्दीमध्ये वणवा लावणाऱ्या चारूदत्त पांडुरंग देशपांडे, रा. मंगळवार पेठ, सातारा यांना न्यायालयाने ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दि. ७ मार्च २०२२ रोजी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला परिसरात वन विभागाच्या हद्दीत चारूदत्त पांडुरंग देशपांडे यांनी वणवा लावला होता. सातारा वनपरिक्षेत्रा अधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल कुशल पावरा, वनरक्षक राजकुमार मोसलगी, महेश सोनवले, गोरख शिरतोडे यांनी याबाबतचा शोध घेऊन चारुदत्त देशपांडे यांच्याविरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यांना अटक करून आज न्यायालयापुढे उभे केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे न्यायालयाने त्यांना ५ हजार रुपये दंड दंड न भरल्यास १० दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली.