maharashtra

महिलांनी आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत : अजय बन्सल


Women should set new standards by their deeds: Ajay Bansal
महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे, एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत. यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी व्यक्त केली.

सातारा : महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे, एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत. यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने येथील अलंकार हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष माधवी कदम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तळबीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बन्सल पुढे म्हणाले, अनेक महिलांनी यशस्वीरीत्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला सातत्याने कृतीचे बळ मिळायला हवे अशा अपेक्षा बन्सल यांनी व्यक्त करून सत्कारमूर्ती महिलांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
वैद्यकीय विभागातील अधिपरीचारिका गीता पवार, एसटी महामंडळ वाहक रेखा वाजे, जिल्हा पोलिस दलातील दिपाली यादव, आंतरराष्ट्रीय धावपटू व उद्योजक कांचन कुचेकर, प्लंबर महिला उज्वला मोरे, इलेक्ट्रिशियन महिला कामगार अरुणा फाळके, स्कूल बस चालक सुजाता सोनटक्के, सफाई कामगार आणि दाखोडे अंगणवाडी सेविका सुनिता साळुंखे, आरडी परेड राजपथ दिल्ली युनिटच्या महिला पोलीस नाईक सोनाली बनकर, कोर्ट कामकाज पाहणाऱ्या पोलीस हवालदार सुवर्णा निकम, शितल पवार या सर्व महिलांचा उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल चांदणे खराडे व पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने महिला अत्याचारासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर भरोसा सेल यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 264 महिला उपस्थित होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आणि ताम्हणकर चव्हाण, सहाय्यक फौजदार राऊत, पोलीस हवालदार एमडी बाचल, पोलीस हवालदार एस यु पवार, पोलीस हवालदार लोखंडे, आरडी तोरस्कर, मोहिते, टी.व्ही. वाघमारे, पोलीस हवलदार डी.डी. भागडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.