महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे, एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत. यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मागण्यांचे निवेदन पाठवले.
राहत्या घरातील लाईटचा मीटर बदलण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या फलटण येथील प्रधान तंत्र कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कार्तिकस्वामी तुळशीराम गुरव (वय 45, रा. लक्ष्मी नगर कर्मचारी वसाहत, रोड क्रमांक आठ, फलटण. मूळ राहणार पिंगोरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महेंद्र शंकर माने, वय ३५, रा. काळचौंडी, ता. माण याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खेड ता. सातारानजिक कंटेनरच्या चाकाखाली सापडून क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
डबेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या रिक्षा अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
गवंडी काम करत असताना दुसर्या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या वीज वितरण कार्यालया जवळून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खेड बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून ४६ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व मोबाईलची चोरी केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.