maharashtra

बोरणे गावच्या हद्दीत दोन दुचाकींची धडक


Two two-wheelers collide in Borne village boundary
सातारा - जांभे मार्गावर बोरणे गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : सातारा - जांभे मार्गावर बोरणे गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन रामचंद्र सपकाळ, वय २८, रा. जांभे, ता. सातारा हा दुचाकीवर पाठीमागे बसून सातारा येथून जांभेकडे जात असताना बोरणे गावच्या हद्दीत त्याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकी शी धडक झाल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.