रस्त्याचे काम करीत असताना डांबराने भाजून एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : रस्त्याचे काम करीत असताना डांबराने भाजून एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील समता पार्क परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना अरुण दिनकर खंडझोडे, वय ५८, रा. नागेवाडी, ता. सातारा हा रस्त्याचे काम करत असताना झारीच्या साहाय्याने रस्त्यावर डांबर फवारत असताना ठेच लागून पडल्याने झारीतील डांबराने भाजून जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


