maharashtra

कृष्णानगर येथून इलेक्ट्रिक साहित्याची चोरी


Theft of electrical equipment from Krishnanagar
येथील कृष्णानगर परिसरात असणाऱ्या धोम पाटबंधारे उपविभागीय कार्यालयातुन अज्ञात चोरट्याने २६ हजार ५०० रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील कृष्णानगर परिसरात असणाऱ्या धोम पाटबंधारे उपविभागीय कार्यालयातुन अज्ञात चोरट्याने २६ हजार ५०० रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ रोजी ६.३० ते दि. ८ रोजी ९.४५ वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील धोम पाटबंधारे उपविभाग क्रमांक २ च्या कार्यालयाचे बंद दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने २६ हजार ५०० रुपये किमतीचे दोन संगणक सेटसह इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याची तक्रार अरुण हणमंत भिसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.