maharashtra

जिल्ह्यात गळफास लावून दोघांच्या आत्महत्या


Two committed suicide by hanging in the district
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ मार्च रोजी सकाळी ९ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान भोगाव येथील रामदासी नावाच्या शिवारात असलेल्या आंब्याच्या झाडाला तेथीलच राजेंद्र भिकु मांढरे, वय ४९ याने मानसिक स्थिती ठीक नसल्याने दारूच्या नशेत दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर जगन्नाथ भिकु मांढरे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या घटनेत दि. ८ मार्च रोजी ५ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी, ता. जावली येथे तेथीलच धोंडीबा दगडु शिंदे, वय ६२ यांनी राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खबर संपत किसन शिंदे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दाखल केली.