maharashtra

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाला मारहाण


One was beaten for not paying for alcohol
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाला दोन अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाला दोन अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जुना मोटर स्टँड येथे भाजी मंडई समोर देशी दारू च्या दुकानाबाहेर दारू पिण्यास पन्नास रुपये न दिल्याच्या कारणावरून संतोष भानुदास दांडे, रा. सातारा याला दोन अज्ञात इसमांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.