येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पिस्तूलच्या सहाय्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याबरोबरच संशयितांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हे दाखल आहेत.
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील चाहुर येथील ऊमेश भोसले या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या शेतावर काम करणाऱ्या विवाहीत शेतमजूर महिलेवर वाई शहरातील एका लॉजमध्ये आणि आपल्या शेतात जवळपास वर्षभराच्या कालावधीत बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारापोटी उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे आणि वित्त व लेखा महाराष्ट्र शासन पुणे यांच्या माध्यमातून माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रेनिमीत्त जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब जाईचीवाडी (बोंद्री) यांच्या वतीने येथील तुळजाईसिटी मैदानावर दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून आवसरी संघ जानाई-भैरवनाथ चषकाचा मानकरी ठरला.
'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांत प्रथमच अत्यंत जल्लोषात शाहूनगरी ने रंगपंचमीचा आनंद घेतला. बालगोपाळांनी एकमेकांना यथेच्छ रंगात भिजवून काढत पर्यावरण पूरक रंगांच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी केली. साताऱ्यात दिवसभर रंगपंचमीचा अनोखा उल्हास पाहायला मिळाला.
वडूथ, ता. सातारा येथील स्मशानभूमीलगत असणाऱ्या वेण्णा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी आढळला. या मृतदेहाचे दोन्ही डोळे निकामी असल्याने घातपाताची शक्यता व्यक्त होवू लागली. दरम्यान, या घटनेने वडूथ व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीसही दाखल होत त्यांनी अज्ञात मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.
येथील सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयानजीक आज पहाटे रस्त्याकडेला एक ५ वर्षीय बालिका निपचित अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्रथम उपचार करून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथे रविवारी मध्यरात्री एकावर फायरिंग करून कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने फायरिंग झाले मात्र पिस्तूलमधून गोळी बाहेर न आल्याने अनर्थ टळला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.