पिस्तूलच्या सहाय्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याबरोबरच संशयितांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हे दाखल आहेत.
सातारा : पिस्तूलच्या सहाय्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याबरोबरच संशयितांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 मार्च रोजी 10.30 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील भेंडा महा परिसरात असणार्या शाकिर मिस्त्री यांच्या गॅरेज समोर त्याच परिसरात वास्तव्य करणाऱे साहिल गौतम रणदिवे हा त्याचे मित्र ऋषिकेश आवारे, साहिल सावंत, युवराज भोसले यांच्यासोबत गप्पा मारत बसल्या होता. दरम्यान त्या ठिकाणी शुभम विनोद कांबळे, साहिल जमीर जमादार, विजय विनोद कांबळे (सर्व रा. बुधवार नाका, सातारा) हे आले. त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून साहिल गौतम रणदिवे याच्यावर पिस्तुलमधून गोळीबार केला, फायरिंग झाले मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
परस्पर विरोधी तक्रारी दाखल
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल झाले असतानाच या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. याबाबत विजय विनोद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दि. 19 मार्च रोजी 10.34 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील पिलेश्वरी नगर येथील अवधुत अपार्टमेंटच्या तळमजल्यावर साहिल रणदिवे, साहिल सावंत आणि विजय उर्फ रोहन कांबळे (सर्व रा. गेंडामाळ, सातारा) व दोन इतर अनोळखी इसमांनी हातामध्ये कोयत्या सारखे शस्त्र घेऊन तुला मारून टाकतो असे म्हणून बिल्डींगच्या गेटसमोर मला कोयत्याने मारहाण केली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


