वेडेवाकडे, हयगयीने वाहन चालवणार्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : वेडेवाकडे, हयगयीने वाहन चालवणार्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 मार्च रोजी 1 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील पोस्ट ऑफिस ते हेम शोरूम मार्गावर अनंत दिलीप जाधव, वय 38, रा. मयुरेश्वर कॉलनी, सातारा हा आपल्या ताब्यातील वाहन वेडेवाकडे, हयगयीने ठरवत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस शिपाई सुहास तात्याबा शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


