maharashtra

वेण्णा नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह


The body of an unknown person was found in Venna river basin
वडूथ, ता. सातारा येथील स्मशानभूमीलगत असणाऱ्या वेण्णा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी आढळला. या मृतदेहाचे दोन्ही डोळे निकामी असल्याने घातपाताची शक्यता व्यक्त होवू लागली. दरम्यान, या घटनेने वडूथ व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीसही दाखल होत त्यांनी अज्ञात मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

सातारा : वडूथ, ता. सातारा येथील स्मशानभूमीलगत असणाऱ्या वेण्णा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी आढळला. या मृतदेहाचे दोन्ही डोळे निकामी असल्याने घातपाताची शक्यता व्यक्त होवू लागली. दरम्यान, या घटनेने वडूथ व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीसही दाखल होत त्यांनी अज्ञात मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ गावची स्मशानभूमी ही वेण्णा नदीपात्रालगत आहे. सोमवारी या वेण्णानदीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. पाण्यावर तरंगणाऱ्या या मृतदेहाचे दोन्ही डोळे निकामी असल्याचे पाहिल्यानंतर काही वेळातच ही चर्चा गावभर पसरली अन गर्दी होवू लागली. त्यावेळी प्रथमदर्शनी ग्रामस्थांनीही घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोस्टमार्टमनंतर या अज्ञाताचा घातपात आहे किंवा त्या मृतदेहाचे डोळे जलचर प्राणी अथवा कोणतरी फोडले आहेत, हे समजणार असल्याचा प्राथमिक अंदाज सातारा तालुका पोलिसांनी व्यक्त करत याबाबतची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात केली.