खंडाळा येथील तुकाराम भिकू जाधव व प्रमिला तुकाराम जाधव या दांपत्याला त्यांचे शेजारी घराच्या जागे संदर्भातून वारंवार त्रास देत असल्याची तक्रार प्रमिला जाधव यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे केली आहे. प्रमिला जाधव यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली.
अपहरण व खंडणी प्रकरणातील पाडळी, ता. सातारा येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले. शिवेंद्र राजेंद्र ढाणे असे त्याचे नाव आहे.
भाजपचे माणचे आक्रमक शैलीचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी ही घोषणा केली. माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती झाली आहे.
भुईंज (ता वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना २५ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले. या आंदोलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले.
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात असणाऱ्या वेणेखोल-कातवडी रस्ता हा उरमोडी धरणाच्या रिंगरोड चा भाग आहे. या रस्त्याच्या एकूण लांबीपैकी बाराशे मीटर रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतील असून, या रस्त्याच्या निर्मितीवेळी मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची टिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे.
पारधी समाजावर पोलिस अन्याय करतात असा आरोप करीत आज सोमवारी पारधी समाजातील काही लोकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर गोंधळ घातला. दरम्यान, या ठिकाणी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी तातडीने रूग्णालयात हालवले. दरम्यान, येथे गोंधळ घालणा-यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे गर्दी जमवून विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी माजी नगरसेवक पित्यासह त्याच्या पुत्रावर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये लाउडस्पीकरचे साहित्य जप्त केले आहे.
दि. 19 रात्री पिकअपमधून जात असताना या वाहनाला गाडी आडवी मारुन ती थांबवून दोघांना मारहाण करत लुटमार केली. रोहित कुंभार व संकेत गुजर (दोघे रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरुध्द अमिर नजीर सय्यद (वय 25, रा. निंबुत ता.बारामती) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला मारहाण केल्याची घटना सातार्यात घडली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.