पारधी समाजावर पोलिस अन्याय करतात असा आरोप करीत आज सोमवारी पारधी समाजातील काही लोकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर गोंधळ घातला. दरम्यान, या ठिकाणी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी तातडीने रूग्णालयात हालवले. दरम्यान, येथे गोंधळ घालणा-यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सातारा : पारधी समाजावर पोलिस अन्याय करतात असा आरोप करीत आज सोमवारी पारधी समाजातील काही लोकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर गोंधळ घातला. दरम्यान, या ठिकाणी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी तातडीने रूग्णालयात हालवले. दरम्यान, येथे गोंधळ घालणा-यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सातारा शहरातील पोवईनाका येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा कोयना-दौलत बंगला आहे. येथे आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक पारधी समाजातील काही पुरुष व महिलांनी गोंधळ घालत राडा केला. या प्रकारामुळे पोवई नाकापरिसरातील आणि शहरातील नागरिकांची मंत्री देसाईंच्या घरासमोर गर्दी झाली होती. त्यामुळे तेथील मुख्य चौकातच वाहतूकीची कोंडी झाली होती. पारधी समाजावर पोलिस अन्याय करतात असा आरोप पारधी समाजातील लोक करत असताना गोंधळ करीत होते. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे बंगल्यात नव्हते. ते मुंबईत अधिवेशनासाठी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.


