maharashtra

शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची पोलिसांत तक्रार

पारगाव खंडाळा येथील जाधव कुटुंबाची कैफियत

Woman lodges complaint with police
खंडाळा येथील तुकाराम भिकू जाधव व प्रमिला तुकाराम जाधव या दांपत्याला त्यांचे शेजारी घराच्या जागे संदर्भातून वारंवार त्रास देत असल्याची तक्रार प्रमिला जाधव यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे केली आहे. प्रमिला जाधव यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली.

सातारा : खंडाळा येथील तुकाराम भिकू जाधव व प्रमिला तुकाराम जाधव या दांपत्याला त्यांचे शेजारी घराच्या जागे संदर्भातून वारंवार त्रास देत असल्याची तक्रार प्रमिला जाधव यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे केली आहे. प्रमिला जाधव यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली.
प्रमिला जाधव पुढे म्हणाल्या की पारगाव येथे त्यांची पिढ्यानपिढ्या असणारी जागा आणि जमीन आहे. त्यांचे शेजारी अभिजीत संकपाळ, रामदास संकपाळ, हनुमान संकपाळ, विक्रम संकपाळ हे सतत त्यांना त्रास देत असतात. या कुटुंबियाकडून जागेत अतिक्रमण करणे, सांडपाणी टाकणे, कचरा टाकणे, आम्हाला त्रास होईल असे वर्तन करत असल्याचे प्रमिला जाधव यांनी सांगितले. हा त्रास गेल्या आठ वर्षापासून सुरू आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधितांना ताकीद देण्यात आली होती. त्यानुसार बारा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 जानेवारी 2018 रोजी खंडाळा पंचायत समितीने याचा त्यांना बोलावून सदर प्रकरणासंदर्भात ताकीदही दिली आहे. 18 जानेवारी 2018 रोजी आम्ही आमच्या जागेत घराचे बांधकाम सुरू केले असता संबंधितांनी पुन्हा हरकत घेऊन आमचे काम बंद पाडले. हे कोणत्याही शासकीय यंत्रणेला अजिबात दाद देत नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
अगदी नळकनेक्शन घेण्यासंदर्भातही त्यांचा वारंवार अडथळा होत आहे. त्यामुळे या इसमांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी कळकळीची विनंती प्रमिला जाधव यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.