maharashtra

गेंडामाळ परिसरात फायरिंग करून एकावर वार


firing at Gendamal area
येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथे रविवारी मध्यरात्री एकावर फायरिंग करून कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने फायरिंग झाले मात्र पिस्तूलमधून गोळी बाहेर न आल्याने अनर्थ टळला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथे रविवारी मध्यरात्री एकावर फायरिंग करून कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने फायरिंग झाले मात्र पिस्तूलमधून गोळी बाहेर न आल्याने अनर्थ टळला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० मार्च रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथील शाकीर मिस्त्री यांच्या चारचाकी गॅरेज समोर तेथीलच साहिल गौतम रणदिवे वय १७ हा ऋषिकेश आवारे, सागर सावंत, युवराज भोसले असे गप्पा मारीत बसले होते. दरम्यान याठिकाणी शुभम विनोद कांबळे, साहिल जमादार, विजय विनोद कांबळे सर्व रा. बुधवार नाका, सातारा हे त्या ठिकाणी आले. त्यांनी साहिल जमादार, विजय कांबळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शुभम कांबळे याने त्याच्याकडील पिस्तुलमधुन फायरिंग केले. मात्र पिस्तुलमधुन गोळी बाहेर न आल्याने साहिल रणदिवे, ऋषिकेश आवारे, साहिल सावंत, युवराज भोसले हे चार जण थोडक्यात बचावले. या घटनेत वापरलेले पिस्तुल शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.