दि. 19 रात्री पिकअपमधून जात असताना या वाहनाला गाडी आडवी मारुन ती थांबवून दोघांना मारहाण करत लुटमार केली. रोहित कुंभार व संकेत गुजर (दोघे रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरुध्द अमिर नजीर सय्यद (वय 25, रा. निंबुत ता.बारामती) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा : दि. 19 रात्री पिकअपमधून जात असताना या वाहनाला गाडी आडवी मारुन ती थांबवून दोघांना मारहाण करत लुटमार केली. रोहित कुंभार व संकेत गुजर (दोघे रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरुध्द अमिर नजीर सय्यद (वय 25, रा. निंबुत ता.बारामती) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे त्यांच्या चुलत्यासोबत पिकअपमधून साहित्य घेवून बारामतीला निघाले होते. ते भूविकास चौकात आल्यानंतर त्यांना संशयित दोघांनी अडवले आणि मारहाण करुन लुटमार केली.


