येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणार्या नटराज मंदिराच्या गेट समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.11 क्यु 3912 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली चित्रकाराला आकाश तुकाराम कोळी रा. आंबेदरे रोड, ता. सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


