येथील सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयानजीक आज पहाटे रस्त्याकडेला एक ५ वर्षीय बालिका निपचित अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्रथम उपचार करून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
सातारा : येथील सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयानजीक आज पहाटे रस्त्याकडेला एक ५ वर्षीय बालिका निपचित अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्रथम उपचार करून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, खिंडवाडी ते सोनगाव जाणाऱ्या मार्गावर सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालया जवळ रस्त्याच्या कडेला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ५ वर्षीय बालिका निपचित अवस्थेत पडली असल्याचे सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी तेथील स्थानिक नागरिकांना माहिती दिल्यानंतर नागरिकांनी याबाबत १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली. रुग्णवाहिकेतून तिला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे तिच्यावर प्रथमोपचार करून तात्काळ तिला पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संतप्त पडसाद उमटत आहेत.