atrocitiesongirlsnearsatarapolytechniccollege

esahas.com

सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयानजिक बालिकेवर अत्याचार

येथील सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयानजीक आज पहाटे रस्त्याकडेला एक ५ वर्षीय बालिका निपचित अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्रथम उपचार करून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.