सैदापुर, ता. कराड येथे राहत्या घरी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सैदापुर, ता. कराड येथे राहत्या घरी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजेश रमेश घोरपडे, रा. गोजेगाव, ता. सातारा याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत वाळू चोरी केल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून डंपरसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दुचाकी निष्काळजीपणाने चालवून स्वतःच्या मृत्यूस व अन्य एकास जखमी केल्याप्रकरणी रुजाय पिंटो, वय ६०, रा. टिळकवाडी (बेळगाव), कर्नाटक यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.
एकामागोमाग एक झालेल्या सिलेंडर स्फोटांनी पुणे हादरलं. पुण्यातल्या कात्रजमधल्या गंधर्व लॉन्सजवळ सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. गोडाऊनमध्ये सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. गोडाऊनाला अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाले.
तलाठी किरण तानाजी पवार यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच पवार यांना मारहाण करुन शासकिय कामात अडथळा करणाऱ्या तसेच त्यांना धमकी दिल्याबद्दल तानाजी खाशाबा वलेकर (वय 38) व सचिन दादा राजगे (वय 35, दोघे रा. पिंपरी ता. माण) या दोघांना अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय काळे यांनी दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड व दंड न भरलेस दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
सुरूर, ता. वाई येथूनदोन ट्रकच्या डिझेल टाकीमधुन एकाने डिझेलची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
फडतरवाडी, ता. सातारा येथे विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.