maharashtra

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा


A case of molestation of a minor girl
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजेश रमेश घोरपडे, रा. गोजेगाव, ता. सातारा याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजेश रमेश घोरपडे, रा. गोजेगाव, ता. सातारा याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२८ मार्च रोजी दोन वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात असणाऱ्या समाज मंदिराशेजारी अल्पवयीन मुलगी हाफशिवर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी राजेश घोरपडे याने तिचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने संबंधित मुलीच्या आईने त्याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.