maharashtra

बुध गावच्या हद्दीत वाळू चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हे

डंपरसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Crimes against two in sand theft case in Budh village
बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत वाळू चोरी केल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून डंपरसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा : बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत वाळू चोरी केल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून डंपरसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ मार्च रोजी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास दूध गावच्या हद्दीत कमानीजवळ फलटण ते पुसेगाव जाणाऱ्या मार्गावर गोरखनाथ उर्फ पप्पू बाळु जाधव, कृष्णात उर्फ बाबू विलास सावंत दोघेही राहणार पिराचीवाडी (ताथवडा), ता. फलटण हे दोघे विनापरवाना शासकीय वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून डंपरसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलीस शिपाई साहिल मुसाझारी यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.