खोडद, ता. सातारा येथे गट नंबर 218 या क्षेत्रामध्ये जमिनीत खड्डे करण्याच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. या टोळक्याने आपल्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन हिसकावल्याची फिर्याद राहुल गायकवाड राहणार निसराळे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून एकाने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. या हल्ल्यामध्ये संतोष पवार हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू वैराग, अजय बागल, रवी सप्टेंबर, प्रथमेश पवार यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सातारा एसटी स्टँड ते सेव्हन स्टार थेटर यादरम्यान अज्ञाताने दोन नागरिकांची मोबाईल परस्पर लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल झाली आहे. चोरट्याने वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लांबवले आहेत.
कृष्णानगर वसाहतीजवळ सिंचन विभागाच्या शाखा कार्यालयाचे लोखंडी गेट आणि रेलिंग लोखंडी वस्तूने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या तिघांपैकी एकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर गाठींचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर गाठींच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून त्यांच्या किंमतीमध्ये वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सातार्याच्या बाजारपेठेत पाडव्याच्या साखर गाठींचा गोडवा महागला आहे.
वर्णे, ता. सातारा येथे स्थानिक विकास निधीतून झालेला रस्ता निकृष्ट असताना बांधकाम विभागाने या रस्त्याची खोटी कागदपत्रे सादर करून दि.25 मार्च रोजी केलेले उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला असून बांधकाम विभागाचे अभियंता, उप अभियंता व कर्मचार्यांना निलंबित करून त्यांचेवर गुन्हा दाखल करावा
महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले गुढी पाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.
महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले गुढी पाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.
संगमनगर, सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सैदापुर, ता. कराड येथे राहत्या घरी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.