maharashtra

जुन्या भांडणाच्या रागातून एकावर कोयत्याने वार


From the rage of old quarrels, strike one with a scythe
जुन्या भांडणाच्या रागातून एकाने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. या हल्ल्यामध्ये संतोष पवार हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू वैराग, अजय बागल, रवी सप्टेंबर, प्रथमेश पवार यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

सातारा : जुन्या भांडणाच्या रागातून एकाने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. या हल्ल्यामध्ये संतोष पवार हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू वैराग, अजय बागल, रवी सप्टेंबर, प्रथमेश पवार यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी संतोष पवार आणि त्याचा मित्र युवराज भोसले हे आकाशवाणी झोपडपट्टी येथून जात होते. त्यावेळी संबंधित संशयितांचे आणि फिर्यादीची जुन्या भांडणाच्या कारणावरून बाचाबाची झाली होती. याचा जाब विचारण्याच्या रागातून राजू वैराट यांनी पवार यांच्या दंडावर कोयत्याने वार केला व इतर तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस हवालदार इस्ते तपास करत आहेत.