साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर गाठींचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर गाठींच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून त्यांच्या किंमतीमध्ये वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सातार्याच्या बाजारपेठेत पाडव्याच्या साखर गाठींचा गोडवा महागला आहे.
सातारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर गाठींचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर गाठींच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून त्यांच्या किंमतीमध्ये वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सातार्याच्या बाजारपेठेत पाडव्याच्या साखर गाठींचा गोडवा महागला आहे.
साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ व पारंपारिक पद्धतीने गाठी बनविणार्या मजूरांची कमतरता, इंधनाचे चढे भाव यामुळे यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. साखर गाठींचे भाव 140 ते 150 च्या घरात पोहोचले आहेत. सातार्याच्या बाजारात साखर गाठी दिसण्याचे प्रमाण कमीच असून मिठाई व्यावसायिकांना गाठी बनविणारे कारागिर गोळा करताना दमछाक झाली आहे. गाठींचे साचेसुद्धा मिळत नसल्याने साखरगाठींचा भाव वाढला आहे. सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर येथून कारागिरांना मोठी मागणी असते. मात्र या कारागिरांनी सातार्यात तळ न दिल्याने मिठाई व्यावसायिकांना खूपच अडचण झाल्याने मिठाई विक्रेते चंद्रहास जाधव यांनी सांगितले. साखरे बरोबरच इतर कच्च्या मालाच्या दरात दुप्पट- तीप्पट वाढ झाली आहे.
येथील राजेश जगताप यांचा साखर गाठी तयार करण्याचा व्यवसाय आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. यावर्षी त्यांनी 20 क्विंटल साखरेपासून हार तयार केले आहेत. सध्या 130 ते 140 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. या चढ्या दरानेच सातारकरांना साखर गाठी घ्याव्या लागणार आहेत.


