सातारा एसटी स्टँड ते सेव्हन स्टार थेटर यादरम्यान अज्ञाताने दोन नागरिकांची मोबाईल परस्पर लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल झाली आहे. चोरट्याने वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लांबवले आहेत.
सातारा : सातारा एसटी स्टँड ते सेव्हन स्टार थेटर यादरम्यान अज्ञाताने दोन नागरिकांची मोबाईल परस्पर लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल झाली आहे. चोरट्याने वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लांबवले आहेत.
या प्रकरणी संदीप दशरथ पवार वय 35 राहणार पंताचा गोट यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी फिर्यादी शिक्षक बँकेसमोर सेव्हन स्टार बिल्डिंग कडे येत असताना त्यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल अज्ञाताने लांबवला. तसेच दिलीप शिंदे वय 31 यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल चोरीला गेला. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.


