सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव हक्काचे ठिकाण असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारांच्या ओपीडी वेळेआधीच बंद होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचार नक्की घ्यायचे कोठे, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. डॉक्टर नक्की जातात कुठे आणि करतात काय, या विषयावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.
"गुजरात, उत्तर प्रदेशात भोंगे कमी झाले का? याची राज ठाकरेंनी चौकशी करावी" राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना असा सवाल केला आहे. लोक राज ठाकरे यांना ओळखून आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झालेत का? याची माहिती राज ठाकरे यांनी घ्यावी, असा टोला पाटील यांनी लगावत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पावसाळ्यात रंगबेरंगी फुलांची उधळण करत असलेले कास पठार जागतिक वारसा स्थळ असून आता विद्यमान उपवन संरक्षक महादेव यांच्या संकल्पनेतून कासच्या जंगलात नाईट सफारी सुरु करण्यात येणार असून दि. 19 रोजी या नाईट सफारीला सुरवात होणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या निर्णयाला निसर्गप्रेमी सातारकरांमधून विरोध होवू लागला आहे.
वाई येथील यशवंत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलीस असल्याची बतावणी करून गुरुवार पेठेतील एका इसमाला दोघांनी लुटल्याचा प्रकार दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता जुन्या औद्योगिक वसाहतींमध्ये कोल्डस्टोरेज येथे घडला आहे. याप्रकरणी लक्ष्मण महादेव साळुंखे वय 18 राहणार गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत डी-मार्ट जवळ लक्झरी बस रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर-ट्रॉली ला आदळून झालेल्या अपघातामध्ये लक्झरी मधील प्रवासी जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी शुक्रवार पेठेतील एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
देगाव तालुका सातारा येथील विवाहितेला मारहाण करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी मंदा जाधव व निलेश साळुंखे राहणार देगाव यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हरून रसूल शेख यांनी फिर्याद दिली आहे.
स्वराज पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आयुर अर्बन मल्टी पर्पज निधी लि. कंपनीत पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवत विडणी, ता. सातारा येथील मोहन लक्ष्मण खरात वय 40 यांची सुमारे 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणे, त्याची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे यांच्यासह संतोष तुकाराम आगवणे सर्व रा. गिरवी, ता. फलटण या तिघांवर फलटण शहर पोलीस गुन्हा दाखल झाला आहे.
ऐतिहासिक शाहू कालामध्ये देशातील पहिले सुनियोजीत शहर असा नावलौकिक असणाऱ्या सातारा शहरामध्ये पुन्हा अतिक्रमणे बोकाळल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झारीचा बोळ आणि हुतात्मा उद्यान चौक या चौकांमध्ये पुन्हा अतिक्रमणे वाढल्याने पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग नक्की करतो काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.