maharashtra

विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई


Preventive action in case of beating of a married woman
देगाव तालुका सातारा येथील विवाहितेला मारहाण करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी मंदा जाधव व निलेश साळुंखे राहणार देगाव यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हरून रसूल शेख यांनी फिर्याद दिली आहे.

सातारा : देगाव तालुका सातारा येथील विवाहितेला मारहाण करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी मंदा जाधव व निलेश साळुंखे राहणार देगाव यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हरून रसूल शेख यांनी फिर्याद दिली आहे.
दिनांक 14 रोजी सायंकाळी साडेसात वाजता संशयितांनी जुन्या भांडणाच्या रागातून घरी येऊन फिर्यादीच्या पत्नीस हाताने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. पोलीस हवालदार वायदंडे यांनी या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.