विखळे फाटा, ता. खटाव येथील एका रानात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका युवकावर बळजबरीने मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघेही रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोन नराधमांना वडूज पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या उमेदवारीस घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने यावरील सुनावणी पुढे ढकलली. आता गुरुवार (दि २७) रोजी सुनावणी होणार आहे.
करंजे तर्फ सातारा येथील सर्व्हे नंबर २५९/१/२ मधील ९१०० चौ.मी. हे क्षेत्र एनए केले असून ते रद्द करण्यात यावे. हे क्षेत्र एनए करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे.
प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्य शासनाला भोंग्या संदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे ? घटनेने सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर आपण स्वतः प्रसंगी गुन्हा दाखल करू, असा थेट इशारा 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची अडचण वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची साताऱ्यातील पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने 5 वाजता त्यांना सातारा जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी नाकारली मात्र, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा पुढील मुक्काम आर्थर जेलमध्ये आहे. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज मंगळवारी सातारा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शहरातील एका भागात राहत असलेल्या महिलेने पाणी भरण्यासाठी नळाला मोटर लावली. ही मोटार काढण्यास तिने नकार दिल्याने तिला चौघांनी मारहाण केली आहे.
लिंब, ता. सातारा येथील एकाने पोलीस परवाना न घेता स्वत:च्या चारचाकी वाहनावर बेकायदेशीर स्पीकर लावून प्रचार केला. त्याने आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत साहेबराव सावंत(वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी वाई ते व्याहळी रस्त्याने गस्त करीत असताना पसरणी गावच्या हद्दीत आळेवाट या ठिकाणी टेम्पो क.एम एच -०८८०७४१ टेम्पोसह जळाऊ लाकडे वन खात्याने ताब्यात घेतली.
जाखणगाव ता. खटाव येथे पुसेगाव-औध रस्त्यावर मोटारसायकलला चारचाकी भरघाव वाहनाने समोरुन धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक व पाठीमागे बसलेल्या दोघांपैकी एकजण असे दोघेजण ठार झाले. तसेच दुसरा सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव हक्काचे ठिकाण असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारांच्या ओपीडी वेळेआधीच बंद होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचार नक्की घ्यायचे कोठे, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. डॉक्टर नक्की जातात कुठे आणि करतात काय, या विषयावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.