maharashtra

जाखणगाव येथील अपघातात दोघेजण ठार; एकजण गंभीर


Two killed in Jakhangaon accident; One serious
जाखणगाव ता. खटाव येथे पुसेगाव-औध रस्त्यावर मोटारसायकलला चारचाकी भरघाव वाहनाने समोरुन धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक व पाठीमागे बसलेल्या दोघांपैकी एकजण असे दोघेजण ठार झाले. तसेच दुसरा सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

पुसेगाव : जाखणगाव ता. खटाव येथे पुसेगाव-औध रस्त्यावर मोटारसायकलला चारचाकी भरघाव वाहनाने समोरुन धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक व पाठीमागे बसलेल्या दोघांपैकी एकजण असे दोघेजण ठार झाले. तसेच दुसरा सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
मोटार सायकल चालक कुणाल शंकर जाधव (वय 23, रा. भोसरे, ता. खटाव) व अभिजीत मधुकर येवले (वय 36, रा. देवाची आळंदी, जिल्हा पुणे) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर बाबा निवृत्ती जगदाळे (राहणार- बोथे, ता. माण) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शनिवारी (दि. 16) सायंकाळी 6 वाजता भोसरे, ता. खटाव येथील किर्तनकार कुणाल शंकर जाधव हे त्यांचे मित्र किर्तनकार अभिजीत मधुकर येवले व बाबा निवृत्ती जगदाळे यांना पुसेगाव येथे मोटार सायकलने (क्र. एस.एच 11 सीवाय 3956) सोडण्यास निघाले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जाखणगाव, ता. खटाव गावच्या हद्दीत पोवई नावाच्या शिवारात पुसेगाव- औंध रस्त्यावर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने (क्र. एम.एच.11 जेएन 2500) जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात कुणाल जाधव व अभिजीत येवले हे ठार झाले, तर मोटारसायकलवरील अन्य सहप्रवासी बाबा निवृत्ती जगदाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जीवन पांडुरंग जाधव (रा. गादेवाडी, ता. खटाव) हा या चारचाकी वाहनाचा चालक असून कुणालचे भाऊ संकेत शंकर जाधव (वय 21, राहणार भोसरे, ता. खटाव) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. फौजदार बाळासाहेब लोंढे या घटनेचा तपास करत आहेत.