maharashtra

आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील यांच्या उमेदवारी आक्षेपावर सुनावणी पुढे ढकलली

किसन वीरच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Hearing on the objection of MLA Makrand Patil and Nitin Patil was postponed
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या उमेदवारीस घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने यावरील सुनावणी पुढे ढकलली. आता गुरुवार (दि २७) रोजी सुनावणी होणार आहे.

वाई : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या उमेदवारीस घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने यावरील सुनावणी पुढे ढकलली. आता गुरुवार (दि २७) रोजी सुनावणी होणार आहे.
किसन वीर कारखाना निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील व प्रमोद शिंदे यांच्या उमेदवारीस कारखान्याचे संचालक प्रताप यादव व इतर यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिटपीटिशन मध्ये निवडणूक प्रक्रिया थांबवण्यास उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. या प्रक्रियेत उमेदवारांना आजपर्यंत नोटिस मिळालेली नाही. याबाबत प्रतिवादीना नोटिसा पोहोचविण्यास सांगून न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. याबाबत उच्च न्यायालयातील वकील संजीव कदम यांनी सांगितले की, पुढील तारखेपर्यंत नोटिसा पोहोचवाव्यात. तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्यात यावी. निवडणूक प्रक्रियेस कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास न्यायालयाने नकार दिला आहे. याप्रकरणी गुरुवार (दि २७) रोजी सुनावणी होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस उद्या मंगळवार (दि १९) आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील व प्रमोद शिंदे सध्या तरी कायम राहिले आहेत.