maharashtra

वन खात्याकडून जळाऊ लाकडासह टेम्पो जप्त


Tempo confiscated with firewood from Forest Department
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी वाई ते व्याहळी रस्त्याने गस्त करीत असताना पसरणी गावच्या हद्दीत आळेवाट या ठिकाणी टेम्पो क.एम एच -०८८०७४१ टेम्पोसह जळाऊ लाकडे वन खात्याने ताब्यात घेतली.

सातारा : मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी वाई ते व्याहळी रस्त्याने गस्त करीत असताना पसरणी गावच्या हद्दीत आळेवाट या ठिकाणी टेम्पो क.एम एच -०८८०७४१ टेम्पोसह जळाऊ लाकडे वन खात्याने ताब्यात घेतली.
वाई येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक गस्त सुरू केली आहे. संशय आल्याने या टेम्पोला अटकाव करुन थांबवून टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये आसाना बोर, बहावा, शिरस जातीचा जळावू लाकूडमाल विना परवाना वाहतूक केल्याचे दिसून आल्याने टेम्पो चालक विजय बाळू कोचळे रा.पसरणी ता. वाई यांच्यावर भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम ४१ 7 (२)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा चे महादेव मोहिते, सुधीर सोनावले सहा. वनसरंक्षक वनीकरण सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली वाई येथील वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनपाल सुरेश सुर्यवंशी, संग्राम मोरे, वनरक्षक करुणा जाधव यांनी केली आहे. सुमारे अडीच लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
पाचगणी -महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्याच्या पायथ्याशी वाई ही दक्षिण काशी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून त्याची माहिती वन खात्याला देण्यासाठी कोणी स्वतःहून पुढे येत नसताना ही कारवाई झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.