maharashtra

नळाची मोटर न काढल्याने महिलेस मारहाण


Woman beaten for not removing pipe motor
शहरातील एका भागात राहत असलेल्या महिलेने पाणी भरण्यासाठी नळाला मोटर लावली. ही मोटार काढण्यास तिने नकार दिल्याने तिला चौघांनी मारहाण केली आहे.

सातारा : शहरातील एका भागात राहत असलेल्या महिलेने पाणी भरण्यासाठी नळाला मोटर लावली. ही मोटार काढण्यास तिने नकार दिल्याने तिला चौघांनी मारहाण केली आहे.  
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिला पाणी भरत असताना तिने नळाला मोटर लावली. हे पाहून राग आल्याने ती मोटर काढण्यास सांगितले. ती न काढल्याने सलीम चाँद शेख, साद सलीम शेख, मिनाज सलीम शेख व त्यांची बहिण यांनी संगणमत करून तिला मारहाण केली. व शिवीगाळ करून तुम्ही इथून गेली नाहीस तर मुले आणून तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी दिल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस नाईक वाघ करत आहेत.