maharashtra

युवकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना अटक


Two men arrested for unnatural atrocities on youth
विखळे फाटा, ता. खटाव येथील एका रानात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका युवकावर बळजबरीने मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघेही रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोन नराधमांना वडूज पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.

सातारा : विखळे फाटा, ता. खटाव येथील एका रानात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका युवकावर बळजबरीने मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघेही रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोन नराधमांना वडूज पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, कलेढोण येथे द्राक्ष कंपनी मध्ये काम करणाऱ्या एका युवकाला कंपनीने कामावरून काढल्यानंतर संबंधित युवक विखळे, ता. खटाव येथील एका बार मध्ये जाऊन दारू पीत बसला होता. त्यानंतर त्याठिकाणी आलेल्या अनोळखी राहुल शिंदे व प्रशांत निकम या दोघानी त्याची विचारपूस केली. त्यांची त्यातून ओळख झाली. त्यानंतर तिघे मिळून दारू पिल्यानंतर आरोपींनी तुला तुझे कंपनीकडून राहिलेले पैसे मिळवुन देतो चल आमच्या सोबत, असे बोलून त्या युवकाला घेऊन कलेढोण कडे जात असताना मध्येच रस्त्यात थांबुन त्याला मारहाण केली. तसेच युवकावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून संबंधित दोघाही नराधमांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि मालोजो देशमुख करत आहेत.