maharashtra

बेकायदेशीर स्पिकर लावल्याने एकावर गुन्हा  


One offense for illegally installing a speaker
लिंब, ता. सातारा येथील एकाने पोलीस परवाना न घेता स्वत:च्या चारचाकी वाहनावर बेकायदेशीर स्पीकर लावून प्रचार केला. त्याने आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत साहेबराव सावंत(वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.  

सातारा : लिंब, ता. सातारा येथील एकाने पोलीस परवाना न घेता स्वत:च्या चारचाकी वाहनावर बेकायदेशीर स्पीकर लावून प्रचार केला. त्याने आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत साहेबराव सावंत(वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.  
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब गावात राहत असलेले श्रीकांत साहेबराव सावंत याने स्वत:च्या चारचाकी वाहन (क्रं. एमएच 11 सीएच 8541)वर पोलीसांची परवानगी न घेता स्पीकर लावले. हा स्पीकर लावून गावातील विविध निवडणुकीच्या अनुशंगाने अजिंक्य पॅनलचा प्रचार करत होता. हे पोलिसांना दिसून आल्याने त्यांची चौकशी करून त्यांच्या विरूद्ध आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास सहायक फौजदार बागवान करत आहेत.