oneoffenseforillegallyinstallingaspeaker

esahas.com

बेकायदेशीर स्पिकर लावल्याने एकावर गुन्हा  

लिंब, ता. सातारा येथील एकाने पोलीस परवाना न घेता स्वत:च्या चारचाकी वाहनावर बेकायदेशीर स्पीकर लावून प्रचार केला. त्याने आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत साहेबराव सावंत(वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.